गुन्हेताज्या बातम्याव्हायरल व्हिडिओ

रस्ता ओंलाडताना वेगवान कारची धडक, व्यक्ती 20 फूट हवेत, पहा व्हिडीओ

राजस्थानच्या धौलपूरमध्ये रस्ताय ओलांडताना एका व्यक्तीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वेगवान कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, रस्त्या ओलांडणारा व्यक्ती 20 फूट हवेत उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्यावरच्या अपघाताची मालिका सुरु असल्याने एकीकडे नागरिक संताप व्यक्त करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील धौलपूर जिल्ह्यातील कौलारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बसई नवाब परिसरात ही घटना घडली आहे. दरब सिंग असं अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे. दरब हे हरलाल गावातील रहिवासी आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असातना एक वेगवान कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दरब सिंग हवेत 20 फुट उडाला.

या भीषण अपघातात दरब सिंग गंभीर जखमी झाले आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवला आहे. जखमींला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातस्थळावरून कार चालक फरार झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. कार चालक अद्याप पोलिसांच्या ताब्यात आला नाही. पोलिस त्याच्या शोधात आहे.

पहा व्हिडीओ:

x.com/…patrika/status/1794249027556610098

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button