ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

‘माझी आवडती कार ( पॉर्शे , फरारी , मर्सिडीज)’ ,’माझा बाप बिल्डर असता तर ?’ अशा विविध विषयांवर पुण्यात भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

पुण्यातील घटनेवर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी आता पुणे काँग्रेसने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केलं आहे. राज्य सरकारच्या कारभाराला टार्गेट करणं हा त्यामागे उद्देश आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी रात्री दोनच्या आसपास मोठा अपघात झाला होता. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या पोर्ष गाडीने तरूण-तरूणीच्या बाईकला धडक दिली. या धडके दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पुण्यातील हिट अँड रनच प्रकरण सध्या देशभरात गाजतय. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवलं. यात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती.

शिक्षा म्हणून त्याला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता. या प्रकरणाने व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. आरोपीवर कठोर कलम लावली नाहीत, असं काहींच मत आहे. त्यातून पुणे पोलिसांवर देखील अनेक गंभीर आरोप झाले. या प्रकरणात गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना कळवली नाही, म्हणून दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन सुद्धा करण्यात आले आहे. एकूणच व्यवस्थेतील भोंगळ कारभार, आरोपी बड्या बापाचा मुलगा असेल, तर कायद्याला कसं वाकवता येतं, हे या प्रकरणात दिसून आलय. त्यामुळे राज्यभरात जनतेच्या मनात संतापाची भावना आहे. आता पुणे काँग्रेसने या प्रकरणावर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केलं आहे. 11 हजार 111 रुपयाच पहिलं बक्षीस ठेवण्यात आलं आहे.

विषय – माझी आवडती कार ( पॉर्शे , फरारी , मर्सिडीज,)

दारूचे दुष्परिणाम

माझा बाप बिल्डर असता तर ?

मी खरच पोलीस अधिकारी झालो तर ?

अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण ?

आमदार रविंद्र धंगेकरांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण

वयोमार्यदा 17 वर्ष ते 58 वर्ष

रविवारी सकाळी स्पर्धेच आयोजन

स्थळ – अपघात स्थळी बॉलर पब समोर कल्याणीनगर

ड्रायव्हरवर गुन्हा अंगावर घेण्यासाठी जबरदस्ती

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल चालकावर दबाव टाकत होते. ड्रायव्हरने गुन्हा त्याच्या अंगावर घ्यावा यासाठी जबरदस्ती सुरु होती. दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अपघाताच्यावेळी पोर्श गाडी तू चालवत होता, असं पोलिसांना सांग. गुन्हा तुझ्या अंगावर घे, विशाल अग्रवाल यांनी चालकाला त्यासाठी पैशांची ऑफर दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button