भारत-बांगलादेश सराव सामना कुठे रंगणार ?वाचा संपूर्ण माहिती

0
14

भारतीय संघाची पहिली तुकडी अमेरिकेला पोहोचली असून त्यात हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीचा समावेश नव्हता, मात्र हार्दिक सराव सत्रात भारतीय संघासोबत दिसला, विराट कोहली मात्र अजून कोणत्याच सराव सत्रात दिसला नाही परंतु सामन्यापूर्वी संघात सामील होण्याची शक्यता जरी असली तरी तो सामना खेळेलच याची शक्यता खूपच कमी आहे. बांगलादेशचा अमेरिकेविरुद्धचा पहिला सराव सामना पावसामुळे वाहून गेला तर यापूर्वी अमेरिका आणि बांगलादेश यांच्यामध्ये टी२० मालिका रंगली होती तर त्या मालिकेतसुद्धा बांगलादेशची कामगिरी १-२ अशी लाजिरवाणी ठरली त्यामुळे हा सामना अमेरिकेने जिंकला.

भारत ठरतोय वरचढ
मागील काही काही वर्षांत भारतविरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमधील अनेक अविस्मरणीय सामने झाले असून भारताने एकूण १३ सामन्यात १२ वेळा बांगलादेशला धूळ चारली आहे तर एकंदरीतच भारताचे पारडे जड असल्याचे कळते. भारत आणि बांगलादेश यांच्यातला सर्वात संस्मरणीय सामना २०१६च्या टी २० वर्ल्डकप मधला आहे, ज्यात भारताने बांगलादेशच एका धावाने पराभव केला होता. टी-२०वर्ल्ड कपच्या मागील हंगामात दोन्ही संघांमध्ये चुरशीचे सामने झाले आहेत.

भारत-बांगलादेश सराव सामना कधी आहे?
भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२४ चा सराव सामना शनिवार, १ जून रोजी होणार आहे.

भारत-बांगलादेश सराव सामना कुठे रंगणार ?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामना किती वाजता सुरु होणार ?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल तर नाणेफेक संध्याकाळी ७.३० वाजता होईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होणार?
टी-२० वर्ल्डकप २०२४च्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स वन एचडी/एसडीवर उपलब्ध असेल आणि हिंदी कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स हिंदी एचडी/एसडीवर उपलब्ध असेल. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, स्टार स्पोर्ट्स चॅनल बंगाली, कन्नड, तेलगू आणि तामिळसह इतर भाषांमध्ये लाइव्ह कॉमेंट्री प्रदान करेल.

फोन किंवा लॅपटॉपवर लाइव्ह सामना कुठे बघता येणार?
Disney + Hotstar वर लाइव्ह सामना पाहता येईल.