
‘सनम तेरी कसम’ सिनेमा री-रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी सिनेमा बघायला हाउसफुल्ल गर्दी केली. ‘सनम तेरी कसम’ री-रीलीज होऊन आता पाच दिवस झालेत आणि या सिनेमाने १० कोटींहून अधिकची कमाई केलीय. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन या दोघांची केमिस्ट्रीला पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांचं प्रेम मिळालं. ‘सनम तेरी कसम’ सिनेमाचा सीक्वल अर्थात ‘सनम तेरी कसम २’ कधी रिलीज होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. अखेर याविषयी स्वतः दिग्दर्शकांनी खुलासा केलाय.
एका मुलाखतीत ‘सनम तेरी कसम’चे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू यांनी खुलासा केला की, ‘सनम तेरी कसम २’ची स्क्रीप्ट तयार आहे. पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून ‘सनम तेरी कसम २’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. ‘सनम तेरी कसम’च्या लिखाणातच हा सिनेमा दोन भागांमध्ये बनवण्याची आम्ही योजना केली होती. त्यामुळे ‘सनम तेरी कसम’च्या सीक्वलवर आधीपासूनच काम सुरु आहे. ‘सनम तेरी कसम २’मध्ये सरुची साथ सुटल्यावर इंदरचा (हर्षवर्धन राणे) पुढील प्रवास कसा असणार, हे बघायला मिळेल.
‘सनम तेरी कसम’च्या मेकर्सने काहीच दिवसांपूर्वी ‘सनम तेरी कसम २’च्या स्क्रिप्टवर काम करुन कथा तयार केली आहे. यावर्षी व्हॅलेंटाइन डेला ‘सनम तेरी कसम’ री-रीलीज झाला आणि सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘सनम तेरी कसम’च्या मेकर्सच्या आनंदाला उधाण आलं. त्यामुळेच लवकरात लवकर ‘सनम तेरी कसम २’चं शूटिंग सुरु करुन पुढील वर्षी अर्थात २०२६ च्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवसांमध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होईल. याविषयी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.