चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तसेच शरीराची हालचाल कमी किंवा एक्सरसाईज न केल्यामुळं जास्तीत जास्त लोक आजकाल लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. एकदा जर वजन वाढलं ते कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि भरपूर वेळही द्यावा लागतो.
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. ज्यातील एक उपाय म्हणजे डिटॉक्स ड्रिंक. यात सगळ्यात वर ग्रीन टी आणि अॅप्पल सायडर व्हिनेगरचं नाव घेतलं जातं. दोन्ही ड्रिंक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण अनेकदा लोक या गोष्टीबाबत कन्फ्यूज असतात की, वजन कमी करण्यासाठी कोणतं ड्रिंक जास्त चांगलं ठरतं?