विटा : कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाने आत्महत्या करत जीवन संपवले

0
30

माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा/प्रतिनिधी : कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता सुरज जनार्दन निकम (वय.30, रा नागेवाडी, ता.खानापूर) याने राहत्या घरी गळफास लावून जीवन यात्रा संपवली. सदर घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. कुस्ती क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावलौकीक मिळवणाऱ्या एका युवा कुस्तीपटूच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकम गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होता. कुस्ती खेळताना त्याला सतत दुखापत होत असल्याने त्याला नैराश्य आले होते. अलीकडच्या काळात त्याचा चिडचिडेपणा वाढला होता. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तो घरात एका खोलीत दार बंद करून बसला होता. मात्र सायंकाळी पाचवाजेपर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. कुटुंबातील सदस्यांनी त्याला बाहेरून हाका मारणे सुरू केले. परंतु प्रतिसाद मिळत नाही. हे पाहून दरवाजा जबरदस्तीने उघडला. तेंव्हा त्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

विट्यातील ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत असल्याचे घोषित केले. 2014 मधील कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील तो विजेता होता. 2018 साली त्याने उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळवला होता. महाराष्ट्र केसरी पै.अभिजित कटके याच्या विरोधात उपांत्य सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here