भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल ; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

0
68

माणदेश एक्सप्रेस न्युज : मावळ : लोणावळा येथील भुशी धरणाजवळील धबधब्यात रविवारी दुपारी चार ते पाच पर्यटक वाहून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेसह मुलं धबधब्यात वाहून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिस आणि स्थानिक स्वयंसेवकांची टीम पर्यटकांना शोधण्यासाठी काम करत आहे.

धरणाजवळील रेल्वेच्या विश्रामगृहाच्या मागे हा धबधबा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेपासून या भागात मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धबधब्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here