
Animal Viral Video: जंगलाच्या जगात कोणता शिकारी आपल्या ताकदीने संपूर्ण खेळ कधी बदलेल हे कोणालाही माहीत नसते. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा जंगलाशी संबंधित कोणताही व्हिडीओ इंटरनेटवर येतो तेव्हा तो वापरकर्त्यांमध्ये लगेच व्हायरल होतो. सामान्यपणे माणूस असो प्राणी, पक्षी आपल्याला एखाद्या गोष्टीपासून धोका आहे, असं समजताच सर्वजण त्या संकटापासून दूर पळतात. आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. कधी कोण कोणाच्या तावडीत सापडेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे सर्वच प्राणी आपला जीव मुठीत ठेवून फिरत असतात. त्यांचा जीव नेहमीच धोक्यात असतो. पण सध्या शिकारीचा असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका रानडुकराने एक नाही तर तीन प्राण्यांपासून आपला जीव वाचवला आहे. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल, हे कसं काय शक्य आहे?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रानडुक्कर आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे. ते पाहून असे म्हणता येईल की, कदाचित तो दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस होता. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक रानडुक्कर पाणी पिण्यासाठी तलावाच्या काठावर उभा आहे. त्यानंतर अचानक एक मगर पाण्यातून बाहेर येते आणि त्याच्यावर हल्ला करते. मगर आपल्या शक्तिशाली जबड्याने जंगली डुकराला पकडण्याचा प्रयत्न करते; परंतु धोका पाहून डुकर मगरीपासून स्वतःचा बचाव करून पळून जातो. त्या पहिल्या वेळी डुकराने मृत्यूला हरवून आपला जीव वाचवला.
जेव्हा तो या संकटातून सुटला तेव्हा त्याला वाटले असेल, की आता तो सुरक्षित आहे; परंतु त्याच्यावरील संकट तेथेच संपत नाही. सिंहांच्या एका गटाने रानडुकराला जंगलातील मोकळ्या मैदानात धावताना पाहिले. त्यांनी लगेच त्याचा पाठलाग सुरू केला. जेव्हा रानडुकराला पुन्हा एकदा आपल्या जीवाला धोका जाणवला तेव्हा तो पुन्हा आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसतो. व्हिडीओमध्ये रानडुक्कर त्याच्या सर्व शक्तिनिशी धावताना दिसतो आणि सिंह त्याच्यामागे वेगाने येत होते; पण रानडुकराने हार मानली नाही आणि तो आपला जीव वाचवण्यासाठी सतत धावत राहिला आणि शेवटी सिंहांना चुकवून तो एका दाट भागात लपला.
सिंहांपासून पळून गेल्यानंतर रानडुकराला अजून आराम मिळाला नव्हता तेव्हा तरसांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी रानडुकराला सर्व बाजूंनी घेरले आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण या वेळीही रानडुक्कर धीर न सोडता, त्याच्या वेगवान गतीने आणि हुशारीने तो तरसांना चुकवण्यात यशस्वी झाला. शेवटी तो सुरक्षित ठिकाणी पोहोचला.
हा व्हिडीओ आतापर्यंत एक कोटी ८० लाख लोकांनी पाहिला आहे आणि सुमारे तीन लाख लोकांनी तो लाईक केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “हा जंगली डुक्कर खरा योद्धा आहे. मृत्यूला तीन वेळा हरवले.” त्याच वेळी दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “डुकराच्या धाडसाला सलाम!” हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक तो पुन्हा पुन्हा शेअर करीत आहेत.
Bruh he had to run thru three different hoods just to get home to his family😩😂 pic.twitter.com/MtaxYmeblc
— vids that go hard (@vidsthatgohard) May 6, 2025