माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहित पाटील यांना पहिला गुलाल

0
19

माणदेश एक्सप्रेस न्युज / माळशिरस/प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे 8000 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर हे पिछाडीवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आल्याने मारुती जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांना शिवरातन बंगल्यावर जाऊन पहिला गुलाल लावला आहे.

या मतदारसंघातील सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. पहिल्या दोन फेरीत धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. मोहिते पाटील हे 8500 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here