सातारा लोकसभा : उदयनराजे भोसले 27000 मतांची पिछाडीवर पिछाडीवर

0
9

माणदेश एक्सप्रेस न्युज/ सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आहेत. तर भाजपचे उदयनराजे भोसले मात्र या रेसमध्ये दिसेनासे झाले आहेत. (शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेच्या सहापैकी सहा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान यावेळी झालं आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here