आटपाडी

Video : आटपाडी तालुक्यातील मुसळधार पाऊस ; ओढे, नाले भरून गेले : शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त

तब्बल २० वर्षानंतर कारीच्या ओढ्याला आला पूर

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरासह तालुक्यातील दिघंची, विठलापूर, पश्चिम भागातील खरसुंडी, झरे, घाणंद, घरनिकी, पिंपरी, पडळकरवाडी, जांभुळणी, निंबवडे, वाक्षेवाडी या परिसराला जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. पहिल्याच पावसात या भागातील ओढे, नाले भरून वाहिल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

शनिवारी सकाळ पासून आटपाडी तालुक्यामध्ये पावसाचे ढग दाटून आले होते. सकाळी ११.०० च्या सुमारास आटपाडी शहरामध्ये पावसाचे आगमन झाले. तर याच दरम्यान तालुक्यामध्ये मोठ्या माणात पावसाने हजेरी लावत धुवांधार बॅटिंग केली. पंढरपूर-मल्हार पेठ मार्गावरील निंबवडे रूळाजवळून वाहणार कारीच्या ओढ्याला तब्बल २० वर्षा नंतर पाणी आले असून ओढा दुधडी भरून वाहत होता. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रात सगळीकडे मान्सून दाखल झाला असून मान्सूनने दुष्काळी पट्यात हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून माळरानात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. मृग नक्षत्राचा पहिलाच पाऊस जोरदारपणे पडला आहे. आटपाडी तालुक्यातील दुष्काळी भागात पाऊसच नसल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. आता मान्सून दाखल होताच पहिल्यांदाच जोरदार हजेरी लावल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

 

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button