‘ही’ अभिनेत्री 50 सेकंदच्या जाहिरातीसाठी घेते तब्बल कोट्यवधी रुपये

0
12

रॉयल आयुष्य जगते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावावर सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. त्या अभिनेत्री देखील गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वावर राज्य करत आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नयनतारा… नयनतारा झगमगत्या विश्वातील सर्वत्र श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी. अभिनेत्रीची फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील गडगंज संपत्ती आहे. नयनतारा कायम तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते. 50 सेकंदांसाठी अभिनेत्री कोट्यवधींचं मानधन घेते.

‘जवान’ सिनेमात अभिनेत्रीने किंग खानसोबत झळकलेली नयनतारा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रिपोर्टनुसार, नयनतारा हिने टाटा स्कायच्या 50 सेकंदांच्या एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेतले होते. जाहिरातीचं शुटिंग दोन दिवसांमध्ये पूर्ण झालं होतं. चार भाषांमध्ये जाहिरात शूट करण्यात आली. जाहिरातींप्रमाणे अभिनेत्री एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते.

नयतारा कायम तिच्या संपत्तीमुळे आणि खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या चेन्नईतील घराची किंमत 1000 कोटी रुपये आहे. केरळ आणि मुंबई याठिकाणी देखील नयनतारा हिचं आलिशान घर आहेत. नयनतारा हिचं हैदराबाद याठिकाणी 15 कोटी रुपयांचं घर आहे. चेन्नईमध्ये अभिनेत्रीचं 4 बीएचके घर आहे.

नयनतारा हिचं खासगी आयुष्य
अभिनेत्री नयनतारा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 9 जून 2022 मध्ये चित्रपट निर्माता विघ्नेश शिवन याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या चार महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये नयनतारा सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. अभिनेत्री आता मुलांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

नयनतारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here