वरुण धवन आणि नताशा दलाल बनले आई-वडील, कुटुंबात गोंडस मुलीचे आगमन!

0
12

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या पोटी एक छोटी परी जन्माला आली आहे. काल संध्याकाळी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. ही आनंदाची बातमी वरुण धवनचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांची सून नताशा हिने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. वरुण आणि नताशाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नताशाच्या बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर करताना अभिनेत्याने सांगितले होते की, तो लवकरच पिता होणार आहे. आता अखेर हा टप्पा त्याच्या आयुष्यात आला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here