‘सोनिया गांधी यांची भेट घेतलेला फोटो टाकायला उद्धव ठाकरे घाबरले’, श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला

0
194

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केलीय. आधी सगळे लोक मातोश्रीवर येत होते. पण आज उद्धव ठाकरेंना दिल्लीत येऊन तीन-तीन दिवस बसाव लागतंय. महाराष्ट्रानं असं चित्र कधी पाहिलं नव्हतं असे श्रीकांत शिंदे म्हणाले. सोनिया गांधी यांची भेट घेतलेला फोटो टाकायला उद्धव ठाकरे घाबरले असतील. कारण, त्यांच्यासोबत फोटो आला तर टीका होईल. सोनिया गांधींनी सांगितलं असेल की फोटो टाकायचा नाही असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

वक्फ बोर्ड विधेयकाच्या वेळी ठाकरे गटानं सभागृहाबाहेर पळ काढला
उद्धव ठाकरे अनेक लोकांना फोन करुन भेटायला या म्हणून विनंती करत होते. काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला याबाबत सांगिल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. आयडिऑलॉजिकल संभ्रम ठाकरेंच्या खासदारांमध्ये असल्याचे शिंदे म्हणाले. काल वक्फ बोर्ड विधेयकाच्या वेळी त्यांनी सभागृहाबाहेर पळ काढल्याचे शिंदे म्हणाले. उबाठाच्या नेत्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही भूमिका का स्पष्ट केली नाही. मुस्लीम समाजाला कसा न्याय मिळालं त्यासाठी हे बिल आणलं आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here