“उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं.” ‘या’ खासदारांनी साधला निशाना

0
4

काँग्रेसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला काँग्रेस पक्ष सोडावा लागला, असा गंभीर आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. “काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्यात बघायचे आहे. साऊथ मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट मतदारसंघ आहे आणि त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की आपण ही जागा गमवायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. काँग्रेसला माझ्या शुभेच्छा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं. त्यामुळे मी फार आनंदी आहे. शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनीताई जाधव या फायटर आहेत आणि यामिनीताई नक्कीच निवडून येतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही”, असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

‘ही सगळी विचित्र अवस्था होती’
“एक प्रकारची ही सगळी विचित्र अवस्था होती. गेल्या 45 वर्षात कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही तर मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिलं. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिलं”, असं मिलिंद देवरा म्हणाले. “महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. मी स्वतः एक पांडव आहे त्यातलाच. गिरणी कामगारांचा फार जटील प्रश्न आहे. विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे”, असंही मिलिंद देवरा म्हणाले.