बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवणारी राज्यात एकमेव विद्यार्थीनी

0
7

बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात निकालात पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.51 टक्के तर मुंबईचा निकाल 91.95 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 91.60 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीला बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहे. रेणुका बोरमणीकर असे या विद्यार्थीनीचं नाव आहे. देवगिरी महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. तर राज्यातील 8782 मुलांना 90 टक्के गुण मिळाले, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here