ताज्या बातम्यामनोरंजन

‘हि’ अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात!

वृत्तानुसार, सैफची कन्या सारा हिला तिचा जोडीदार मिळाला असून लवकरच सैफच्या घरात सनई चौघडे वाजणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानबद्दल मोठी बातमी येत आहे. ही अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार असे बोलले जात आहे. साराच्या बाबत एक पोस्ट समोर आली असून त्यात तिची एंगेजमेंट आणि लग्नाची माहिती दिलेली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यापासून चाहते आनंदात आहे. या पोस्टवर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहे.

एका युजरने आपल्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, सारा एका श्रीमंत बिझनेसमनशी लग्न करणार असून तिची एंगेजमेंट झाली आहे. सारा ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे तिच्यावर खूप प्रेम आहे. सारा खूप आनंदी आहे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने साराच्या नात्याला मान्यता दिली आहे म्हणजेच सैफपासून अमृता सिंगपर्यंत सर्वांनी हे नाते स्वीकारले आहे.सारा अली खान तिच्या आगामी ‘मेट्रो’ चित्रपटाचं शूटिंग संपवून लग्नाची तयारी सुरू करणार आहे. असे देखील पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र, अद्याप या पोस्टवर सारा अली खान किंवा तिच्या टीमने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button