राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला हजर होत आहेत. त्यातच राज्याच्या राजकारणातील दोन मोठे नेते आणि विरोधत एकसात विधीमंडळात दिसले. अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे हे एकत्र दिसले. त्या दोघांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. लिफ्ट येण्याआधी दोघे एकमेकांशी बोलताना दिसले. दरम्यान त्याच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात त्याच्या मनोमीलनाची चर्चा रंगली आहे.
कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच पण सुखद चित्र पाहायला मिळाले. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते.
व्हिडीओ पहा-
Watch: Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray and the Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis share the same lift while going to the Vidhan Sabha pic.twitter.com/YmefNTcbGQ
— IANS (@ians_india) June 27, 2024