आज दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी घेतली भेट

0
244

सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत देखील होते. दरम्यान आप चे नेते राघव चढ्ढा, संजय सिंह देखील केजरीवाल यांच्या घरी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सुनिता केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी X वर या भेटीचे फोटो शेअर करताना संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा आमचा लढा सुरू राहील असं म्हटलं आहे. संजय सिंह यांनी या भेटीची माहिती देताना मोदी सरकारच्या हुकूमशाही विरूद्ध तुमच्यासोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी सुनिता केजरीवाल यांना दिली आहे. असे सांगितले.

उद्धव ठाकरे पोहचले अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांच्या भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here