
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील उबेद असलम पेंढारी याची महसूल सहाय्यक पदासाठी एमपीएससी द्वारे निवड झाल्याबद्दल यांना चौंडेश्वरी पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
उबेद पेंढारीने जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. हे यश हे नक्कीच प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी चौंडेश्वरी समूहाचे कुटुंबप्रमुख चंद्रकांत दौंडे यांनी व्यक्त केले. यावेळी चेअरमन राहुल सपाटे, व्हा. चेअरमन योगेश रणदिवे, राजेंद्र दौंडे, सोमनाथ दौंडे तसेच आटपाडी विणकर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन भास्कर चोथे मान्यवर उपस्थित होते. उबेद याचे चुलते इकबाल पेंढारी यांनी त्यांच्या कठीण परिस्थितीत मोठे सहकार्य केले, यामुळे उबेद यांनी जिद्दीने हे स्थान मिळवले. त्यांचे भविष्यातील कार्य अधिक उज्ज्वल होईल.