ताज्या बातम्यागुन्हेमहाराष्ट्र

महाराष्ट्रात चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, वनविभागाचा जंगल भागात छापा

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तापोळा परिसरातील घनदाट जंगलात चंदनची तस्करी होत असल्याची माहिती मिळली. माहिती मिळताच वनविभागाने जंगल भागात छापा टाकला आणि चंदन तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी वनविभागाने अक्षय अर्जून चव्हाण (20) रा. फत्त्यापूर सातारा आणि आशिष विकास पवार ( वय 18 रा. खातगुण सातारा) या दोघांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर चंदन तस्करी करत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर ते तापोळा दरम्यान चंदन तस्करीसाठी एक वाहन आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिली. बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाने छापा टाकण्यास आणि परिसरात बंदोबस्त लावण्यास सुरु केला. गुप्त माहितीच्या आधारे सातारा वनविभागाचे महाबळेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, महाबळेश्वरचे पोलिस निरिक्षक यशवंत नलावडे, पोलिस उपनिरीक्षक रऊफ इनामदार, तापोळा वनपाल अर्चना शिंदे आणि वनरक्षक (कमळगावातील) संदीप पाटोळे यांनी मार्गावर लक्ष ठेवले. गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभी अशलेली चारचाकी पकडली.

पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता, वाहनात 17.231 किलो वजनाचे चंदन, 1 बॅटरी, 1 नी गार्ड, 1 कटर, 3 आरे, 1 कुदळ आणि 3 मोबाईल अश्या वस्तू सापडला. पोलिसांन सर्व साहित्य जप्त केले. वनविभागाने आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2) (ब) अन्वये कारवाई करण्यात आली. पुढील तपास वनविभाग करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button