पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत आढळला अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
19

फलटण तालुक्यातील वडजल गावच्या हद्दीत येथे पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत एका अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामिण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

सदर ठिकाणी पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. या प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here