केमिकल ब्लश न वापरता ट्राय करा हे नैसर्गिक ब्लश

0
2

 

सुंदर दिसण्याकरिता लोक त्वचेसाठी केमिकल युक्त क्रीम वापरतात. ज्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. अनेक लोकांना केमिकल करीम मुळे एलर्जी होते. व चेहरा खराब होऊन जातो. तुम्हाला देखील गुलाबासारखे उजळ गाल हवे असतील तर याकरिता तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. चला तर जाणून घेऊ या कोणते आहे ते उपाय जे तुमच्या गालांना नैसर्गिक पिंक ब्लश लुक देतील.

बीट –
पूर्वी जेव्हा मेकअपचा सामान न्हवता तेव्हा गालांना गुलाबी करण्यासाठी बीटचा वापर केला जायचा. बीट पासून ब्लश बनवण्यासाठी बीट उकळवून घट्ट मिश्रण तयार करावे. यामध्ये थोडे ग्लिसरीन टाकून एका छोट्या कंटेनरमध्ये भरून ठेवावे. व याचा उपयोग तुम्ही गालांना लावण्यासाठी करू शकतात .

गुलाब-
गुलाबाच्या पाकळ्यांनी तुम्ही घरीच ब्लश तयार करू शकतात. मिक्सरमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून बारीक पेस्ट तयार करा. यामध्ये गरजेनुसार आरारोट पावडर मिक्स करा. व एका काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवावे. ताज्या गुलाबपासून बनलेला ब्लश ओला बनेल.

गाजर-
जर तुम्हाला गालांना हलकासा पीच कलर हवा असेल तर नारंगी कलरचे गाजर घ्या. गाजर किसून वाळवून घ्या. मग मिक्सरमध्ये आरारोट सोबत बारीक करावे. मग तुम्ही हे गालांना लावू शकतात.

 

 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत माणदेश एक्स्प्रेस कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here