आरोग्यताज्या बातम्याराष्ट्रीय

ह्या चॅलेंजमुळे 14 वर्षीय मुलाने गमावला जीव ; Cardiopulmonary Arrest ने झाला मृत्यू

अमेरिकेमध्ये एका 14 वर्षीय मुलाने सोशल मीडीयावरील खतरनाक स्वरूपाच्या तिखट चिप खाण्याच्या चॅलेंज मध्ये सहभाग घेऊन cardiac arrest ने आपला जीव गमावला आहे. मृत्यू पश्चात ऑटोप्सी रिपोर्ट्समध्ये याचा खुलासा झाला आहे. मृत मुलगा अमेरिकेतील Massachusetts मधील Harris Wolobah होता. त्याचा मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाला आहे. “One Chip Challenge” मध्ये Paqui द्वारे बनवलेल्या सिंगल चिप, वर Carolina Reaper आणि Naga Viper peppers यांचे डस्टिंग असते.

शवविच्छेदन अहवालात दिलेल्या माहितीच्या आधारे, स्थानिक मुख्य वैद्यकीय परीक्षकांनी सांगितले की हॅरिसचा मृत्यू capsaicin नावाच्या मोठ्या प्रमाणात मिरचीचा अर्क असलेले अन्न खाल्ल्याने हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. या ऑटोप्सी रिपोर्ट्स मध्ये असेही सांगण्यात आले आहे की त्या मुलाचे हृद्य मोठे झाले होते. परिणामी त्याचा मृत्यू झाला. Capsaicin हे मिरचीमध्ये आढळणारे केमिकल कम्पाऊंड आहे ज्यामुळे जळजळ होते. Cardiomegaly सामान्यतः वाढलेले हृदय म्हणून ओळखले जाते. आणि myocardial bridging म्हणजे कोरोनरी धमनी जी हृदयाच्या स्नायूंच्या वरच्या बाजूला जाण्याऐवजी त्याच्या बॅन्डमधून जाते.

हॅरिसच्या मृत्यूनंतर Paqui ने त्यांच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग शवपेटीच्या बॉक्स मध्ये केले होते. ‘extreme heat’ असं त्यावर मार्किंग केले होते. ICMR Warns on Home Made Food: घरी बनवलेले जेवणही धोकादायक असू शकते! आयसीएमआर द्वारे नवी आहार मार्गदर्शक तत्त्वे .

कॅलिफोर्नियामध्येही या चॅलेंज मध्ये भाग घेतल्यानंतर तीन तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि Minnesota मध्ये त्याच कारणास्तव सात जण आजारी पडल्याचे मीडीया मध्ये वृत्त आहे.आता हे चॅलेंज बंद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button