मिरज-पंढरपूर रस्त्यावर ट्रकचा एसटीला अपघात १९ प्रवासी जखमी; अकरा विद्यार्थ्यांचा समावेश

0
954

माणदेश एक्सप्रेस /सांगली : एस.टी. तानंग फाटा येथे आली असता राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेकडे वळण घेणाऱ्या ट्रकने एस.टी.ला पाठीमागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे एस.टी.त पाठीमागील बाजूस बसलेले १९ जण जखमी झाले. जखमीत विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या अपघातामुळे मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

 

अपघातात धनश्री प्रमोद कांबळे, अरमान शाहीर मुलाणी, रोहिणी मल्लिकार्जुन साळुंखे, विराज विशाल बडोनी, कुणाल विनोद साबळे, अभिजित अनिल करपे, शुभम रमाकांत कांबळे, आदिराज आनंद सुर्वे, रूपाली मृत्युंजय हिरेमठ, मृत्युंजय सिद्धमल्ल्या हिरेमठ, संस्कार विकास कांबळे, सुमित शिवाजी बनसोडे, प्रज्ज्वल लहू काळे, समर्थ शैलेश माने, निखिल चंद्रकांत सपकाळ, राहुल सुनील कांबळे, प्रेम उमेश मागाडे, अर्पणा राजेश कांबळे व अन्य एक जखमी झाले. एस.टी. मिरजेतून जतकडे जात होती.