आजचे राशी भविष्य: विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला

0
242

मेष: सरकारी पदांवर असलेल्या लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. काहींच्या बदलीचा योग आहे. वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे वाडवडिलांची संपत्ती मिळण्यातील विघ्ने दूर होतील. मित्र आणि कुटुंबायांकडून कृषी कार्यात सहकार्य मिळेल. एखाद्या योजनेबाबतची खूश खबर मिळले. नव्या उद्योगात सफल व्हाल. राजकारणात असाल तर वर्चस्व वाढेल. क्रीडा क्षेत्रात नावलौकीक वाढेल. नोकरीत वरिष्ठांची मदत होईल. कायद्याशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश आणि सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल वाढेल.

वृषभ: नोकरीत पदोन्नती मिळेल. तसेच नोकरीत कारची सुविधाही मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती सुधारणार. कुटुंबासोबत पिकनिकस्थळी जाल. एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे यशाचा उत्साह वाढेल. राजकारणात वर्चस्व राहील. शिक्षकी पेशातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मीडियातील लोकांना आज खूप धावपळ करावी लागेल. परदेशात जाण्याची संधी हुकेल. आजाराकडे लक्ष द्या, पावसाळी आजारांनी हैराण व्हाल.

मिथुन: आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचा योग आहे. व्यापारातील लोकांनी नव्या लोकांवर विश्वास टाकणं टाळावं, नाही तर व्यापारात मोठा धोका होण्याची शक्यता आहे. नोकरीत अपमानित होण्यापासून दूर राहा. एखाद्या प्रिय व्यक्तीची वाईट बातमी कळेल. कार्यक्षेत्रात मेहनत करावी लागणार आहे. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. कुणालाही पैसा उधार देऊ नका. आयात निर्यातीशी संबंधित लोकांना मोठं यश मिळले. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

कर्क: आजचा दिवस आनंदाचा राहील. कार्यक्षेत्रातील कामे प्रभावीपणे हाताळाल. सकारात्मक विचार करा. जीभेवर ताबा ठेवा. कुणालाही कटू शब्द बोलू नका. विचार करूनच निर्णय घ्या. भाऊ आणि बहिणीसोबत काम करण्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. साहित्य, संगीत, गायन, कला आणि नृत्यात रुची वाढेल. कलेच्या क्षेत्रातच उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण कराल. संपत्तीची खरेदी विक्री करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्ज घेण्याची शक्यता आहे. तुमच्या वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.

सिंह: आयुष्यात छोट्या छोट्या समस्या येत असतात. तशाच त्या आज तुम्हाला जाणवतील. पण त्याने त्रस्त होऊ नका. छोट्या समस्या मोठ्या होऊ न देणं हे तुमच्याच हातात आहे. या समस्या लवकरात लवकर मार्गी लावा. इष्ट मित्रांसोबत काम करताना सावध राहा. कार्यक्षेत्रात स्वत:च्या हिंमतीवर निर्णय घ्या. नोकराचाकरांचे मनोबल वाढेल. बहुराष्ट्रीय कंपन्यात काम करणाऱ्यांना चांगले प्रस्ताव मिळतोल. नोकरीतील चांगली ऑफर स्विकारण्यापूर्वी खातरजमा करा. विचारपूर्वक निर्णय घ्या.

कन्या: एखाद्या कामानिमित्ताने घरापासून दूर जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात आव्हाने निर्माण होतील. नव्या व्यक्तीला महत्त्वाची कामे देऊ नका, नाही तर होणारं काम बिघडेल. प्रवासात एक छोटीशी चूक दुर्घटनेचं कारण होऊ शकते. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. उद्योग क्षेत्रातील लोकांचे विनाकारण मतभेद होतील. त्यामुळे उद्योगात नुकसान होईल. नाहक पैशाची बरबादी होईल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात सावध राहा. प्रामाणिक मित्रांसोबत एखाद्या विशिष्ट योजनेवर चर्चा कराल.

तुळ: आजचा दिवस व्यस्ततेचा ठरणार आहे. नोकरीत तुमच्याकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. राजकीय पक्ष बदलताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांसोबत काम करताना प्रचंड फायदा होईल. दुसऱ्यांना तुमच्या उणीवा जाणवू देऊ नका. नाही तर तुमच्या उणीवांचा लाभ उठवला जाऊ शकतो. व्यवहारिकच राहा. कुणी काहीही सल्ला दिला तरी विचार करूनच निर्णय घ्या. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक: आज अनावश्यक खर्च टाळाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नोकरीत पदोन्नती मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्यात काम करणाऱ्यांना मनाप्रमाणे काम करण्याची मोकळीक मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीची संधी मिळेल. सरकारी योजनेसाठी सरकार दप्तरी खेटा माराव्या लागतील. व्यवसायात लक्ष दिल्यास फायदाच फायदा होईल. तुमची स्थिती सुधारण्याचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना विचार करूनच करा. सामाजिक कार्यात सक्रिय राहाल.

धनु: सुख आणि लाभाचा आजचा दिवस आहे. होणाऱ्या कार्यात अडथळे येतील. सामाजिक मान आणि प्रतिष्ठेबाबत सतर्क राहा. रागावर नियंत्रण ठेवा. सर्वांशी ताळमेळ राखा. रचनात्मक कार्यात भाग घ्या. नोकरीत लक्ष द्या. व्यवहारिक राहा. कोणतंही कार्य पूर्ण होईपर्यंत त्याचा खुलासा करू नका. नाही तर होणारं काम बिघडेल. मनाला सकारात्मक दिशा द्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. प्रवास करणं टाळा.

मकर: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असा ठरणार आहे. कार्यक्षेत्रात अधिक विरोधाभास होतील. व्यापरिक परिस्थिती चांगली आणि अनुकूल असेल. सामाजिक क्षेत्रात नवं काही तरी कराल. उद्योगात मन रमेल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. व्यापारातील लोकांना अचानक धन लाभ होईल. नोकरी बदलण्याचा मूड होईल. बहुराष्ट्रीय कंपन्यात काम करणाऱ्यांना मोठं नुकसान होईल. गावाकडची खबर येईल. शेतीची कामे मार्गी लावण्यावर भर द्याल. नवीन वाहन खरेदी कराल.

कुंभ: आज एखादं महत्त्वाचं काम होता होता राहील. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी सतर्क राहा. लोकांना क्षमा करा. सर्वांशी मिळून मिसळून राहा. मोठा निर्णय घेताना सहकार्यांशी चर्चा करा. तुम्हाला त्रास वाटण्याची शक्यता आहे. कार्यालयातील सहकारी षडयंत्र रचतील. त्यापासून सावध राहा. किरकोळ वाद होतील. घरात अधिक लक्ष द्या. जवळची व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे. दानधर्म करा. प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.

मीन: विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहाचे योग जुळून येतील. पण दिवाळीतच लग्नाचा बार उडण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय असेल. महत्त्वाच्या कामासाठी नवरा तुमचा सल्ला घेईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. किचनचं बजेट बसवताना नाकीनऊ येतील. कामाची दगदग झाल्याने आजार ओढवले. प्रकृतीची काळजी घ्या. पुरुषांसाठी आजचा दिवस चिंता देणारा असेल. लांबचा प्रवास होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here