आजचे राशीभविष्य 17 sep: तुमचा आजचा दिवस अत्यंत चांगला राहील.. सुख सुविधेत वाढ होईल

0
4007

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असा राहील. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या मनमानी व्यवहारामुळे कुटुंबातील सदस्य अडचणीत येतील. कार्यक्षेत्रातील कामात यश मिळेल. नोकरीमध्ये कार्यरत असलेल्यांना दुसऱ्या नोकरीची ऑफर येईल. तुमच्या सर्व जुन्या समस्या मार्गी लागतील. प्रकृती खालावेल. चांगल्या डॉक्टरकडून उपचार घ्या. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल.

वृषभ: इतर दिवसांच्या तुलनेत तुमचा आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. तुम्हाला तुमच्या कामात पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरीत तुम्हाला चांगलं पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. मित्रांसोबत तुम्ही काही काळ मौजमस्तीत घालवाल. प्रेमात पडलेल्यांचे जीवनसाथीसोबत मतभेद होतील. संपत्तीचं वाटप करताना विचारपूर्वकच करा.

मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी राहणार आहे. तुम्हाला मिळकतीच्या नवीन संधी मिळतील. सासूरवाडीकडून धनलाभ होईल. कुटुंबात कुणाच्या आरोग्याची कुरकुर असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज तुमच्याकडून एक चूक होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन काही शिकण्याचा प्रयत्न कराल. विनाकारण होणाऱ्या खर्चांमुळे तुम्ही त्रस्त राहाल.

कर्क: आज तुम्हाला एखादी जोखीम उचलावी लागणार आहे. तुमच्या घरात एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. तुम्ही व्यवसायात एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. पण तुम्हाला एखादा शत्रू त्रास देऊ शकतो. तुमच्या सुख सुविधेत वाढ होईल. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आर्थिक खर्च खूप होणार आहे. तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष द्या.

सिंह: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. विद्यार्थ्यांना आज नवं काही शिकायला मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात बदल करण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एनर्जेटिक राहाल. तुमच्या ऊर्जेचा तुम्ही योग्य तो वापर कराल. आज तुमचा खर्च वाढेल. वैवाहिक जीवनात कलह होण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीच्या कामात निराशा हाती येईल.

कन्या: आजचा दिवस तुम्हाला आर्थिक दृष्ट्या अत्यंत चांगला राहणार आहे. तुमची आर्थिक समस्या आता दूर होणार आहे. तुम्ही एखाद्याकडून पैसा उधार घेण्याचा विचार कराल. एखादं काम दुसऱ्यांच्या भरवश्यावर सोडलं तर त्यात समस्या येईल. तुमचा मित्र तुमच्या एखाद्या कामावर नाराज होईल. जीवनसाथी तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुम्हाला तुमच्या विरोधकांकडून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

तुळ: आजच्या दिवशी तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या राहतील. राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलेल्यांनी आसपासच्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. कार्यक्षेत्रात तुमचा बॉस तुमच्यावर खूश राहील. तुम्हाला नव्या नोकरीची ऑफर दिली जाईल. जाळ्यात फसू नका. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. कोणताही विचार न करता कुणालाही आर्थिक मदतीचं आश्वासन देऊ नका.

वृश्चिक: आजच्या दिवशी तुम्हाला अनेक सुख सुविधा मिळतील. तुम्हाला जीवनसाथीकडून आज एखादं मनपसंत गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीच्या निमित्ताने दूर जावं लागणार आहे. तुमच्या व्यवहारामुळे आजूबाजूचे लोक खूश राहतील. एखादी हरवलेली वस्तू तुम्हाला परत मिळेल. कार्यक्षेत्रातील योजनांमुळे चिंतीत राहाल. तुम्ही विनाकारण कोणतंही टेन्शन घेऊ नका. नाही तर तुमची प्रकृती बिघडेल.

धनु: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे. आज तुम्हाला यश आणि कीर्ती मिळेल. सामाजिक कार्यात तुमची रुची राहील. घाईत आज चुकी करण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या आरोग्यामुळे चिंतीत राहाल. कारण त्यात चढउतार होईल. गावाला जाण्याची शक्यता आहे. नोकरदार महिलांसाठी आजचा दिवस दगदगीचा जाणार आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. आज तुमच्या आयुष्यात मोठी घडामोड घडणार आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य ऐंशी कोणात बदलून जाईल. तुम्हाला नोकरीत मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

मकर: आजच्या दिवशी व्यवहार टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीवरून जीवनसाथी नाराज असेल तर त्यांची मनधरणी करा. बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला असणाऱ्यांवर आज महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सल्ला मसलतीनेच गुंतवणूक करा. कुणाची उधारी असेल तर देऊन टाका. नाही तर बेईज्जत व्हाल.

कुंभ: भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रात सीनिअर तुम्हाला पुरेपूर साथ देतील. भावाबहिणीची तुम्हाला पुरेपूर साथ मिळेल. जीवनसाथीसोबत प्रेम आणि स्नेह निर्माण करा. तुम्ही एखाद्या रचनात्मक कार्यात पुढे जाऊ शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. नोकरीच्या ठिकाणी ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विरोधक आज तुमच्या कामात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न करतील.

मीन: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. व्यवसायात मोठी घडामोड घडणार आहे. त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. कारण तुम्हाला एका नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. धार्मिक कार्यात तुम्ही रुची घ्याल. तुम्ही एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी आईवडिलांचे आशीर्वाद नक्की घ्या. बाहेरच्या खाण्यावर लगाम घाला. प्रियकराच्या वागण्याने चिडचिड होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here