आज भाऊच्या धक्क्यावर निक्कीला झाली सीझनमधली मोठी शिक्षा, संपूर्ण सीझनमधली कॅप्टन्सी…

0
775

बिग बॉसच्या घरात  निक्कीचे पहिल्या दिवसापासून राडे सुरु आहेत. या राड्यांवर घरातल्याही सदस्यांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचलत तिला उत्तरही दिलं. इतकच नव्हे तर भाऊच्या धक्क्यावरही निक्कीची शाळा घेतली, कानउघडणी केली, तंबी दिली तरीही तिच्यात काहीच बदल झाला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता रितेश भाऊंकडून निक्कीला या सीझनमधली सगळ्यात मोठी शिक्षा देण्यात आली आहे.

या आठवड्यात निक्कीच्या घरातल्या वागणुकीवर सगळ्यांनी रोष व्यक्त केला आहे. घरातली कामं न करणं, उगाच कोणत्याही मुद्द्यावरुन वाद घालणं असं सगळं पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. या सगळ्यावर आता रितेश देशमुखने टोकाचा निर्णय घेत निक्कीला चांगलीच अद्दल घडवली आहे.

निक्कीला झाली सीझनमधली मोठी शिक्षा
भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला पुन्हा एकदा झापलं. यावेळी रितेशने म्हटलं की, प्रत्येकवेळी तुम्हाला इतरांचा बाप काढायचा असतो. आता तुमची शिक्षा हिच, की पूर्ण सिझनमध्ये तुम्हाला कॅप्टन होता येणार नाही. त्यामुळे आता पूर्ण सीझनसाठी निक्कीची कॅप्टन्सी गेली असून तिला आता इम्युनिटीही मिळणार नाही.

निक्कीमुळे बिग बॉस मराठीवर प्रेक्षक संतापले
बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातील दोन ग्रुप पडले होते. मात्र, आता टीम एमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की-अरबाज विरुद्ध जान्हवी-वैभव असं समीकरण पाहायला मिळत आहेत. निक्की बिग बॉसच्या घरात काम करत नसल्यामुळे घरातील सर्वच सदस्य तिच्यावर संतापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन निक्की आणि जान्हवीचे खटके उडतानाही दिसत आहेत. एकीकडे निक्की घरातील काम करण्यास तयार नसल्याचं दिसत असताना, तर दुसरीकडे बिग बॉसने जान्हवीला आदेश देत तिच्यासाठी चहा बनवण्यास सांगितला. यावरुन नेटकरी चांगलेच संतापले आहे.

बिग बॉस प्रेमींच्या नाराज प्रतिक्रिया
एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, “बाईSSS हा काय प्रकार? बिग बॉसच निक्की पुढे लाळ पाघळतोय. बिग बॉस निक्कीचा गुलाम, प्रेक्षकांना हलक्यात घेऊ नका.” दुसऱ्याने लिहिलंय, चहा नवना हे सांगता मग, ड्यटी करत नाही तेव्हा काही का बोलतं नाही.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय, “बिग बॉसला निक्कीचा पुळका”. आणखी एका नेटकऱ्याने सवाल उपस्थित करत म्हटलंय, “आर्या जेवली नव्हती तेव्हा बिग बॉस काहीच बोलले नाही, विषय सुद्धा घेतला नाही. आता बघा निक्कीला बसल्या-बसल्या चहाची ऑर्डर देताय.” यावरुन बिग बॉस प्रेमी शोवर चांगलेच भडकल्याचं दिसत आहे.

पहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C_mWglEyiYu

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here