भाऊच्या धक्क्यावर आज गुलिगत किंग सूरज आणि जान्हवी डान्स करताना दिसणार

0
447

छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस म्हणजेच बिग बॉस ठरताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमधील सदस्यांचा चांगलाच बोलबाला आहे. घरातील सदस्यांना बिग बॉसच्या प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. आजही भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना डान्सचा तडका पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य एकापेक्षा एक लयभारी डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे.

गुलिगत सूरजने झापुक झुपुक स्टाईल
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य आज भाऊचच्या धक्क्यावर डान्स करताना दिसणार आहे. घरातील सदस्य जोड्यांमध्ये डान्स करुन घरातील इतर सदस्यांसह प्रेक्षकांचंही मनोरंजन करताना दिसणार आहे. यात गुलिगत सूरज चव्हाणही वेगळी स्टाईल पाहायला मिळणार आहे. सूरज चव्हाण झापुक झुपूक स्टाईलने डान्स करताना दिसणार आहे. यावेळी त्यावा जान्हवी किल्लेकरची साथ मिळणार आहे. सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर कोंबडी पळाली गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. यावेळी सूरज जान्हवीला उचलून घेताना दिसणार असून त्या दोघांची केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीस उतरणार आहे.

जान्हवी आणि सूरजचा भन्नाट डान्स
बिग बॉस मराठीचा पाचवा आठवडा संपत आला आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. सूरजची झापुक झुपक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर अभिजीत आणि निक्कीचा कपड डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. सर्व जोड्यांचा कल्ला पाहण्यासाठी ‘बिग बॉस प्रेमी’ खूप उत्सुक आहेत.

पहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C_XUwfpyr1x