OMG ! पाण्याच्या टाकीत आढळले तब्बल २४ अजगर, वन अधिकारीही घाबरले,पहा व्हिडीओ

0
419

साप, अजगर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. यात सापापेक्षा अजगर जगातील सर्वात प्राणघातक सरपटणारा प्राणी मानला जातो. हा प्राणी कुठेही जाऊन राहू शकतो, त्यामुळे माणसाला त्यापासून अधिक धोका असतो. तसेच नकळत ते आपल्या घराला त्यांचे घर कधी बनवतील काही सांगता येत नाही. महाकाय अजगर आपल्या वेटोळ्यात गुंडाळून माणसाचा जीव घेतो. त्यामुळे अनेकांच्या मनात या प्राण्याविषयी फार भीती आहे. सध्या सोशल मीडियावर अजगाराचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.

पाण्याच्या टाकीत एकाच वेळी तब्बल २४ अजगर
अजगराचा हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील इटावामधील एका गावात आहे. तिथे एका सरकारी कूपनलिकेच्या पाण्याच्या टाकीत एकाच वेळी तब्बल २४ अजगर बाहेर काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इतके अजगर एकाच वेळी पाहून गावकरी देखील हैराण झाले आहेत. या घटनेनंतर आता गावकरी शेतात जाण्यासही घाबरत आहेत.

 

दरम्यान घटनेवेळी वनविभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली, त्यांनी शिताफिने अजगराची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी सोडले. पाण्याची टाकी खोल होती, त्यामुळे बचावकार्यात टीमला खूप अडचणी आल्या. इतके अजगर एकाच वेळी पाहून त्यांना बाहेर काढताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटला.

पाण्याच्या टाकीतून २४ अजगरांची सुटका
हे संपूर्ण प्रकरण इटावा तहसील चाकरनगर भागातील पाली गोपालपूर गावातील आहे. याठिकाणी कूपनलिका पाण्याच्या टाकीत दोन डझन अजगर पाहून ग्रामस्थ हादरले.भीतीमुळे ते आपल्या शेतातही जात नव्हते. दरम्यान, ग्रामस्थांच्या माहितीवरून वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्याच्या टाकीतून २४ अजगर अजगरांची सुटका केली. त्यांच्यामध्ये एक अत्यंत विषारी क्रेट सापही आढळून आला.

चंबळ अभयारण्य परिसरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अजगरांची सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या पकडलेल्या सर्व अजगरांना रेस्क्यू टीमने चंबळ अभयारण्यात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

दरम्यान, बचावकार्य करणारे वन्यजीव तज्ज्ञ डॉ.आशिष त्रिपाठी यांनी सांगितले की, पाण्याची टाकी सुमारे १० फूट खोल होती. येथून अजगरांना बाहेर काढणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. मात्र मोठ्या काळजीने एक एक करून सर्व अजगर बाहेर काढण्यात आले आहेत. पाण्याच्या टाकीतून २४ अजगर आणि एक विषारी क्रेट साप बाहेर काढण्यात आला आहे. अजगर इतके धोकादायक नसतात, परंतु क्रेट साप अतिशय विषारी असतो. त्याच्या दंशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

पहा व्हिडीओ:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here