
जॉन अब्राहमचे सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी अॅक्शन आणि थ्रिलर कहाणीची पर्वणी असते. २०२४ मध्ये जॉनच्या आलेला ‘वेदा’ सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला. परंतु जॉनच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. अशातच नवीन वर्षात २०२५ मधील जॉनच्या आगामी सिनेमाचा टीझर भेटीला आलाय. या टीझरमध्ये जॉन वेगळ्यात भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दमदार संवादांची पेरणी असलेला जॉनच्या ‘द डिप्लोमॅट’ (the diplomat teaser) या आगामी सिनेमाचा टीझर चर्चेत आहे.
‘द डिप्लोमॅट’च्या टीझरमध्ये बघायला मिळतं की, सुरुवातीला परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे एका पत्रकार परिषदेत जगातील सर्वात मोठा डिप्लोमॅट कोण? एक म्हणजे श्रीकृष्ण होते आणि दुसरे हनुमानजी होते असं संबोधताना दिसतात. पुढे टीझरमध्ये जॉन अब्राहमची एन्ट्री होते. जॉन अब्राहम एका डिप्लोमॅटच्या भूमिकेत दिसतोय. नंतर एक महिला बुरखा परिधान करुन स्वतःला भारतीय नागरिक म्हणवते. या महिलेची चौकशी जॉन करताना दिसतो. त्यानंतर दिसतं की जॉनच्या मागावर ISI चे लोक लागलेले असतात. ‘ये पाकिस्तान है बेटा, आदमी हो या घोड़ा, सीधा नहीं चलता है, हमेशा ढाई कदम’ हा दमदार संवाद ऐकायला मिळतो.
जॉन अब्राहमचा आगामी ‘द डिप्लोमॅट सिनेमा ७ मार्च २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय सिनेमात सदिया खतीब, रेवथी, कुमुद मिश्रा, शरीब हाश्मी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ७ मार्च २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. टी सीरिज, जेए एंटरटेनमेंट, फॉरच्युन पिक्चर्स आणि वकाऊ फिल्म प्रॉडक्शन यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. शिवम नायर यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.