‘त्या’ 12जणांनी पूर्ण रात्र नदीतल्या खडकावर बसून काढली, गिरणा नदीत अडकलेल्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन चालू!

0
315

जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या  पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालूच आहेत. हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सर्दपूर पाऊस बरसत (Nashik Rain Update Today) आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाठ होत आहे. याच कारणामुळे नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी अनके अडचणी येत आहेत. दरम्यान, बचावकार्यासाठी आता धुळे येथून एसडीआरएफची विशेष टीम बोलावण्यात आली आहे.

रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथून बोलावण्यात आलेली एसडीआरएफची टीम 4 ऑगस्ट रोजीच्या रात्रीच घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र अंधारामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले होते. आज (5 ऑगस्ट) सकाळी पुन्हा एखदा अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच पुन्हा बचाव कार्य सुरु केले जाणार आहे.

खडकावर बसून काढली रात्र
नदीच्या पाण्यात अडकलेले सर्वजण सध्यातरी सुखरुप आहे. त्यांना काल पाण्यात बाहेर काढणे शक्या झाले नाही. त्यामुळे त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. आता सकाळी पुन्हा एकदा त्यांच्या बचावाची मोहीम चालू झाली आहे. हे सर्वजम मागील 12 ते 14 तासांपासून अडकून पडले आहेत.
मासे पकडायला गेले अन् विसर्ग वाढला

मासे पकडायले गेले अन् अडकून बसले
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गिरणा नदीच्या पाण्यात अडकेलेले हे सर्वजण मासे पकडण्यासाठी गेले होते. पण अचानकपणे पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे काही समजायच्या आत ते नदीत अडकून पडले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना या नदीतून बाहेर येणे अशक्य झाले. नदीत जवळपास 10 ते 12 जण अडकल्याचे समजताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळई धाव घेतली. अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. शेवटी आता एसडीआरएफची टीम त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here