ताज्या बातम्याक्रीडा

‘या’ भारतीय बुद्धिबळ खेळाडूने केला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील खेळाडूचा पराभव ;पहा व्हिडीओ

भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद याने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच बुद्धिबळात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विजय मिळवत तो एकमेव विजेता ठरला आहे.

वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) याने मॅग्नस कार्लसन विरुद्धचा पहिला क्लासिकल विजय मिळवून इतिहास रचला आहे. नॉर्वे येथे पार पडत असलेल्या स्पर्धेत पहिल्या स्थानावर असलेल्या जागतिक क्रमांक एकच्या खेळाडू विरुद्ध खेळणे हे प्रज्ञानंदसाठी नेहमीच कठीण राहिले होते.

गेल्या वर्षीच्या FIDE विश्वचषक स्पर्धेतही प्रज्ञानंद याला कार्लसन याला पराभूत करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले होते. या विजयासह, R Pragnanandaa तिसऱ्या फेरीअखेर 9 पैकी 5.5 गुणांसह नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धेत मध्ये आघाडीवर आहे. तर, झालेल्या पराभवामुळे मॅग्नस कार्लसनची स्पर्धेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

पहा व्हिडीओ :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button