आटपाडी पंचायत समितीचा रोजगार हमी विभाग ब्रम्हदेव पडळकर यांच्याकडून धारेवर

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील घोळ संपत नाही तो पर्यंत सामान्य नागरिकांशी थेट संपर्क असलेला रोजगार हमी विभागाच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. याबाबत माजी  समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांच्याकडे सामान्य नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

याबाबत ब्रम्हदेव पडळकर यांनी आटपाडी पंचायत येथील रोजगार हमी विभागामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी तांत्रिक अधिकारी यांच्याकडे विविध प्रकरणाची माहिती घेतली. तांत्रिक अधिकारी यांनी अद्याप पर्यंत गोठा बिले प्रलंबित असल्या बाबत विचारणा केली असता, तांत्रिक अधिकारी यांनी याबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे तांत्रिक अधिकारी यांना धारेवर धरले.

आटपाडी पंचायत समितीचा रोजगार हमी योजना विभाग का नेहमी अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. यामध्ये तांत्रिक अधिकारी यांनी मस्टर मुद्दामहून झिरो करणे, लाभार्थी कडे पैशाची मागणी करणे, पैसे दिल्या शिवाय कोणतेही काम न करणे याबाबी अनेक वेळा उघड्या झाल्या आहेत.

तसेच यापूर्वी ही जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठकीमध्येच रोजगार हमी योजनेचे अनेक कारनामे उघडे झाले होते. परंतु तांत्रिक अधिकारी यांच्यावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.

परंतु दोन दिवसापूर्वी ब्रम्हदेव पडळकर यांनी आटपाडी पंचायत समिती येथे रोजगार हमी योजना विभागाला सामान्य नागरिकांच्या कामाबाबत फैलावर घेतले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी आता कोणतही कारवाई करणार? की नेहमीप्रमाणे त्यांना पाठीशी घालणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here