‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा टीझर भेटीला. मायरा वायकुळच्या अभिनयाने वेधलं लक्ष

0
209

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मायरा वायकुळ. मायरा आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातील ‘सुंदर परिवानी’ हे गाणं काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आता ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाचा बहुचर्चित टीझर भेटीला आलाय.

 

 

‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या टीझरमध्ये एका गावात मायरा शिकलेली दिसते. तिला देवाच्या घराबद्दल उत्सुकता असते. त्यामुळे प्रत्येकाला ती देवाचं घर म्हणजे काय? असं विचारताना दिसते. इतकंच नव्हे तर ती तिच्या आजीला तू देवाघरी कधी जाणार असं विचारताच आजीला मोठा धक्का बसतो. शेवटी मायरा देवाला पत्र लिहिताना दिसते. मायराला देवाच्या घराबद्दल इतके प्रश्न का असतात? तिला नक्की कशाचा शोध असतो? असे प्रश्न ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा टीझर निर्माण करतो. हा सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे