“कोणाच्या ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका”- संजय राऊत

0
3

मुंबईतील लोकसभेच्या एका जागेवर भाजप , शिंदेंनी दरोडा टाकला. मुंबई उत्तर -पश्चिमच्या जागेवरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजपाचे लोक कायदा गांभीर्याने घेत नाहीत. माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यातील व देशातील विविध महत्वांच्या विषयावर प्रतिक्रिया दिली. नीट घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांविरुद्ध उभे

महाराष्ट्रात आरक्षणावरून संघर्ष सुरूच आहे. लक्ष्मण हाके असोत किंवा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे , मनोज जरांगे दोघेही म्हणतात आमचा सरकारवर विश्वास नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांविरुद्ध उभे आहेत, ते राज्याच्या सुरक्षेच्या आणि शांततेच्या दृष्टीने योग्य नाही. कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

सरकारमधील मंत्री आणि नेत्यांची शिष्टमंडळे उपोषणाला बसलेल्या लोकांची वेळोवेळी भेट घेत आहेत. मात्र उपोषणकर्त्यांकडून त्यांचे प्रस्ताव फेटाळले जात आहेत. शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही कारण कोणत्याही समाजाच्या नेता आणि उपोषणकर्ता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही. नेत्यांचा सरकारवर विश्वास नसेल तर अशा वेळेस सर्व पक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग आहे. दोन्ही बाजूच्या लोकांशी बोलून मध्यममार्ग काढणे ही सरकारची जबाबदारी आहे.. नुसती वक्तव्ये आणि पोकळ आश्वासने देऊन चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.

अटल सेतूची पायाभरणी काँग्रेसच्या राजवटीत

अटल सेतू हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याला अटलजींचं नाव दिलं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झाली. त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जावेत हे योग्य नाही, काय प्रकरण आहे ते पहावं लागेल असं म्हणत राऊत यांनी या विषयावर अती भाष्य करणं टाळलं. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य यायला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here