रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार

0
329

आम. गोपीचंद पडळकर : रोजगार सेवकांच्या शिष्टमंडळाचे पडळकरांना साकडे

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : राज्य सरकारने रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ केली आहे. त्याबाबत शासन निर्णय देखील झाला आहे. परंतु याची अजून अंमलबजावणी झाली नसल्याने, रोजगार सेवकांच्या शिष्टमंडळाने आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेत, त्यांना याबाबत साकडे घातले होते. याबाबत आमदार पडळकर यांनी रोजगार सेवकांच्या मानधना बाबत प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करून, लवकर हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

 

ग्रामरोजगार सेवकांना मानधन मिळणे विषयी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. शासनाने याची दखल घेत शासन निर्णय केला. परंतु याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने, राज्यातील रोजगार सहाय्यक मानधन मिळाले नाही. गाव गाड्यात सामान्य शेतकऱ्यांना रोजगार हमीच्या योजना मिळवून देण्यात देण्यापासून ते त्या योजनेची शेवटपर्यंत दखल घेण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या रोजगार सेवकांना गेली सतरा वर्षापासून मानधन म्हणून शासनाकडून काहीही मिळत नाही.

 

 

केंद्र शासनाच्या बरोबरच महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमीच्या विविध प्रकारांच्या योजना आणि वेगवेगळ्या विभागांचा ताळमेळ घालण्याचं महत्त्वपूर्ण काम आपली एक जबाबदारी म्हणून रोजगार सेवक चोखपणे पार पडत असतात परंतु गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ज्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे त्याच्याकडेच शासना ने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून रोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

 

 

यावेळी रोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ऐवळे, तालुकाध्यक्ष कुमार फुलारे यांच्यासह संतोष कोळपे, विनोद पुजारी, विकास झंजे, दामोदर मुढे, अर्जुन कोकरे, शरद पवार, तात्या मंडले, तातोबा यमगर, शामराव दडस आदि मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here