‘मुंज्या’ हॉरर-कॉमेडी चित्रपटाने गाठला तब्बल इतक्या कोटींचा टप्पा, ‘चंदू चॅम्पियन’ लाही टाकले मागे

0
7

सध्या बॉक्स ऑफिसवर आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. 7 जूनला प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं कौतुक करत आहे. कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ असो किंवा राजकुमार राव व जान्हवी कपूरचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ असो या सगळ्या चित्रपटांना ‘मुंज्या’ जोरदार टक्कर देत आहे. चित्रपटाची 100 कोटींच्या दिशेने जोरदार घोडदौड सुरू आहे. भारतात चित्रपटाने 80 कोटींचा गल्ला पार केला आहे.