भारतात तयार होणार पहिली सेमीकंडक्टर चिप, या प्लँटसाठी 3300 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

0
2179

स्वातंत्र्यानंतर नेहमी आयात करावी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता भारतात तयार होणार आहे. देशात बनलेली पहिली सेमीकंडक्टर चिप 2025 च्या मध्यापर्यंत येणार आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मोदी मंत्रिमंडळाने कायन्स टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडचा रोज 60 लाख चिप बनवण्याचा पॅकेजिंग प्लँटला मंजुरी दिली. या प्लँटसाठी 3300 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. गुजरातमधील साणंद येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत दोन अन्य चिममेकींग प्लॅन्ट येत आहे. कायन्सचा प्लॅन्ट 46 एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाटा कायन्सला जाणार
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कायन्स टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड प्रकल्पाला मंजुरी दिली. या ठिकाणी 6.3 मिलियन सेमीकंडक्टर चिप रोज तयार होणार आहेत. हा प्रकल्प 46 एकरात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात उत्पादन होणाऱ्या सेमीकंडक्टरचा मोठा वाटा कायन्स टेक्नोलॉजीलाच जाणार आहे. त्याची बुकींग यापूर्वीच झाली आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर चीपचा वापर विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यात इंडस्ट्रियल, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहन, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकॉम, मोबाइल फोन यांचा समावेश आहे.

सेमीकंडक्टर प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. या ठिकाणी उभारला जाणारा विशेष क्षेत्रात एकूण दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. त्या सर्व प्रकल्पातून रोज सात कोटी सेमीकंडक्टर चिप तयार होतील.

काय आहे सेमीकंडक्टर
सेमीकंडक्टरला सिलिकॉन चिप असेही म्हणतात. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनात त्याचा वापर केला जातो. या चिपचा वापर केल्याशिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवता येत नाही. एलईडी बल्बपासून ते क्षेपणास्त्रपर्यंत आणि कारपासून ते मोबाइलपर्यंत, संगणकापासून लॅपटॉपपर्यंत सर्व गोष्टींमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. ही चिप इलेक्ट्रॉनिक वस्तूची मेमरी ऑपरेट करण्यासाठी कार्य करते. सेमीकंडक्टरचा वापर स्मार्ट घड्याळे, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, ड्रोन, एव्हिएशन सेक्टर आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here