शाहिद कपूरचा बहुचर्चित सिनेमा’देवा’ चा पहिला रिव्ह्यू आला समोर

0
89

शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘देवा’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. काहीच दिवसांमध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. शाहिद कपूरच्या या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काहीच दिवसांपूर्वी ‘देवा’च्या ‘भसड मचा’ या गाण्याने प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने प्रेम जिंकलं. अशातच ‘देवा’ सिनेमा कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. कारण ‘देवा’चा पहिला रिव्ह्यू समोर आलाय.

 

“देवा एक पैसा वसूल मास एंटरटेनमेंट सिनेमा आहे. शाहिद कपूरने सिनेमात कमाल अभिनय केलाय. शाहिदच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांना खुर्चीवर खिळवून ठेवलंय. सिनेमाचा क्लायमॅक्स कमाल आहे जो पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल. सिनेमाला चांगल्या प्रमोशनची गरज आहे जेणेकरुन सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल सुरुवात करेल. हा सिनेमा इतका भारी आहे की, प्रेक्षकांना सिनेमा नक्कीच आवडणार यात शंका नाही.”

 

‘देवा’ सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. ‘कमीने’ सिनेमानंतर अनेक दिवसांनी शाहिद ग्रे शेड भूमिकेत बघायला मिळणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे. उत्तम सिनेमॅटोग्राफी, अॅक्शन सीन्स आणि त्याला भावनिक जोड या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे.