‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाने गाठला तब्बल 300 कोटींचा गल्ला, जगभरात केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

0
19

कल्की 2898 एडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. विकेंडमुळे प्रेक्षकांनी कल्की चित्रपटाला पसंती दिली आहे. हा चित्रपट गुरुवारी 27 जून रोजी रिलीज झाला होता. चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायफाय चित्रपट कल्की 2898 एडीने अवघ्या चार दिवसांत 302.4 कोटींचा गल्ला पार केला आहे तर हिंदी भाषेतील चित्रपटाने चार दिवसांत 110.5 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता होती. अहवालानुसार, चित्रपटाने जगभरात 500 कोटींची टप्पा ओलांडला आहे. या वर्षात सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. चित्रपटात प्रभास, दिपीका पादूकोण आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय प्रेक्षकांना वेड लावत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here