ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे ते बघता इथे कोणीही सुरक्षित नाही. कोर्टालासुद्धा लेकी-बाळी सासू, सुना आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सध्या घडीला न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहेत. त्यासाठीच आमची लढाई होती. मात्र कोर्टाने अशा प्रकारच्या निर्णय का दिला हे काळाले नाही. शिवसेनानेच्या निकालाबद्दल ज्याप्रमाणे तारखांवर तारखा वाढत आहेत, हाही एक प्रकारे राज्यघटनेवरचा बलात्कारच आहे.
मात्र या बंद बाबतच्या निर्णयाला आम्ही असे म्हणणार नाही की, हा निर्णय कोणाच्या दबावाखाली दिला. पण आम्हाला राज्यातील महिला, युवती आणि कायद्याची काळजी आहे. म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्त्व आहे. मात्र आमचा आवाज दाबत असेल तर लोकशाहीला फार महत्त्व उरणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलताना दिलीय.
कोर्टालाही लेकी-बाळी,सुना आहेत हे लक्षात घ्या – संजय राऊत
बदलापूरची घटना हे अमानवी कृत्य असून त्याच्या निषेधार्थ आज बंद पुकारला होता. आजचा बंद हा स्वयंपूर्तीने पुकारण्यात आलेला बंद होता. जनतेचा आक्रोश देशभरात पोहोचवण्यासाठीचा आजचा बंद होता. तो कुठलाही राजकीय बंद नव्हता. किंबहुना आजचा बंद हा शंभर टक्के यशस्वी होणार होता. ज्यामुळे सरकारला अडचण झाली असती. नुकतीच देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली होती. राज्यसह देशभरात त्याचे पडसाद उमटले. तेव्हा मात्र कोणीही कोर्टात गेले नाही. मात्र महाराष्ट्र बंदची हाक देताच सरकारने एका लाडक्या याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवलं आणि त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. मात्र दुर्दैवाने यापुढे जर अशी घटना घडली तर त्यासाठी न्यायालय आणि त्या संबंधित याचिकाकर्ते जबाबदार राहतील असेही संजय राऊत म्हणाले.
न्यायालयाचा आदर हा राखावाच लागतो- संजय राऊत
माननीय न्यायालयाचा आदर हा राखावाच लागतो. त्यामुळे आज आम्ही बंद जरी मागे घेतला असला तरी महाविकास आघाडी राज्यभरात तोंडाला काळा पट्ट्या बांधून रस्त्यावर उतरणार आहोत. काही वेळातच उद्धव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिक शिवसेना भावना पुढे आयोजित अशा प्रकारच्या आंदोलनात सहभागी होतील. सोबतच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले इत्यादी सह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते ठीकठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली.