
Wedding Viral Video: इंटरनेटवर सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे लग्नासंबंधीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. पण, त्यात काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की, ते पाहिल्यानंतर लगेचच लोकप्रिय होतात आणि लांब कालावधीपर्यंत पाहिले जातात. सध्या एक असाच मजेदार व्हिडीओ समोर आला आहे, जो नक्कीच तुमचं हसू थांबवू शकणार नाही. आज काल लग्न अविस्मरणीय करण्याचा ट्रेंड आहे. त्यासाठी लोक लाखो रुपये मोजायला तयार असतात. लग्नाच्या वेळी वधू-वराची एन्ट्रीदेखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. काही वधू बाईकवरून, काही पालखीतून, तर काही नाचत हॉलमध्ये एन्ट्री करताना दिसतात. लग्न खूप जास्त धुमधडाक्यात केले जाते. लग्नासाठी फोटोशूट करणे हा तर सध्याचा ट्रेंड आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. लग्नामध्ये नवरीची एन्ट्री अविस्मरणीय बनवण्यासाठी काही कसर सोडत नाहीत. लग्नसोहळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते ती नवरीची एन्ट्री. पाहुणे मंडळी नवरा नवरीचा लूक आणि हटके स्टाईल बघण्यासाठी खूप उत्सुक असतात. फोटोग्राफर व्हिडिओग्राफरही नवरीला रेकॉर्ड करीत असतात. याच क्षणी व्हिडीओग्राफरची फजिती झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मजेदार व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात सगळे आनंदात होते. मात्र तेवढ्यात असे काही झाले की, सगळे अगदी थक्कच झाले. लग्नामध्ये नवरीची एन्ट्री होताना व्हिडीओग्राफर नवरीला रेकॉर्ड करत होता. नवरीला रेकॉर्ड करताना व्हिडीओग्राफचं पूर्ण लक्ष नवरीकडेच होतं. हा फोटोग्राफर फक्त शुटींग करण्यात इतका व्यस्त होता की, त्याने आपल्या मागे काय आहे, हेही बघितलं नाही. नवरीला रेकॉर्ड करण्याच्या नादाच व्हिडीओग्राफर थेट जाऊन खरकटी भांडी ठेवण्याच्या टबमध्ये जाऊन धडामदिशी पडला. लग्न सोहळ्यातील काही पाहुणे मंडळी त्याला उचलण्यासाठी धावले; हा प्रसंग इतका मजेशीर होता की, सोशल मिडियावर लगेच व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
या व्हिडीओ नेटकऱ्यांनाही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करून लिहीले की, “या कॅमेरामनला कोणाची तरी नजर लागलीये”, तर दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं की, “असं कोणावरही हसू नये” अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.