
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले असताना, अजित पवार आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेले सूचक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राजकीय वर्तुळात “ठाकरे बंधू एकत्र येणार?” या चर्चेबरोबरच “काका-पुतणे पुन्हा एकत्र?” अशी चर्चा रंगली आहे. दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही या शक्यतेबाबत उत्सुकता आहे. मात्र यावर थेट उत्तर देण्याऐवजी सुप्रिया सुळे यांनी नेहमीप्रमाणे संयम राखत, पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार केला.
“हा माझा वैयक्तिक निर्णय नाही. हा निर्णय पक्षाचा असेल. शरद पवार साहेब लोकशाही मार्गाने निर्णय घेतात. जे निर्णय घेतले जातील ते कार्यकर्त्यांच्या भावना जाणूनच घेतले जातील,” असे सुळे यांनी स्पष्ट केले. याचबरोबर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या चर्चेवरही भाष्य करताना म्हटले, “अजित पवारांसोबत जाण्याच्या निर्णयाला कोणतीही कालमर्यादा नाही.