मार्जिन मनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करा

0
80

माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 8 मार्च 2019  रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांच्याकडे शासन निर्णयातील नमुद सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

 

या योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 9 डिसेंबर 2020 रोजीच्या निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या आहेत.  हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here