स्त्री 2 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

0
96

 

स्त्री चित्रपटाच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘स्त्री 2’ ची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर लॉंच करण्यात आला होता. स्त्री 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. गुरुवारी 18 जुलै रोजी सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहताच प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. ट्रेलरची सुरुवात पंकज त्रिपाठीच्या आवाजाने झाली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री 2’ चित्रपट 14 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

पहा ट्रेलर:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here