मोहरमच्या मिरवणूकीत दोन गटांमध्ये दगडफेक; 10 जण जखमी

0
229

बुलढाणा मध्ये मोहरमच्या मिरवणूकीमध्ये दोन गटांमध्ये संघर्ष झाल्यानंतर सुमारे 10 जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरवणूकीमध्ये दगडफेकदेखील झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7 च्या सुमारास मोहरम ची मिरवणूक Gujri Chowk मधून निघून Garib Shah Baba dargah कडे जात असताना हा प्रकार घडला आहे.

साखरखेर्डा गावातील मलिपुर्याा भागात दगडफेक झाली. तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर जमाव पांगला आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक BB Mahamuni यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव मोठ्या मिरवणूका काढतात. यंदा आषाढी एकादशी आणि मुस्लीम बांधवांचा मोहरम हा सण एकाच दिवशी आला होता.