तीन फूट साचलेल्या पाण्यात एसटी बंद पडली; जुन्या मुंबई पुणे मार्गावरील घटना, बचाव पथकांच्या मदतीने प्रवाश्यांची सुटका

0
226

 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर मधील कोलते गावात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यात प्रवाश्यांना घेऊन जाणारे एस टी बंद पडली. अडकलेल्या प्रवाश्यांना बचाव पथकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

जुन्या मुंबई पुणे मार्गावरील घटना खालापूर जवळ रविवारी सकाळी घटना घडली. २० ते २५ प्रवाश्यांना घेऊन ही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र रिंकी पॅलेस समोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्याच्या मधोमध बस बंद पडली. त्यामुळे बस मधील प्रवाशी अडकून पडले होते. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. धास्तावलेल्या प्रवाश्यांना बस मधून आपत्कालीन दरवाजातून सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक मुंबईकडील मार्गिकेवर वळविण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे जनजिवन विस्कळीत
रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाने जिल्हहयातील जनजीवन पार विस्कलळीत झाले आहे. जिल्ह्या च्या सर्वच भागात दिवसभर पावसाच्याग जोरदार सरी कोसळत होत्या . त्याजमुळे अनेक ठिकाणी रस्यास्कलवर पाणी आले होते. तसेच सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे काही गावांमध्ये सखल भागात पाणी साचले होते.

मिनीडोअरसह प्रवासी बचावले
दुसरीकडे अलिबाग ते खानाव मार्गावरून ठिकठिकाणी पाणी वाहत होते. मात्र वाहनचालक धोका त्यास पाण्याळतून पत्करून त्या पाण्याभतून वाहन चालवत होते. एक मिनीडोअर पाण्याातून येत असताना वाहून जात उलटली. स्थासनिक नागरीकांनी आतील प्रवाशांना आणि मिनीडोअरला सुखरूप बाहेर काढले. अलिबाग रेवदंडा मार्गावर नागाव येथेही रस्त्यावर पाणी झाले होते.