म्हणून निरज मिळवू नाही शकला सुवर्णपदक, देशासाठी लपवून ठेवल होत ‘हे’ सत्य

0
9524

 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने भरपूर प्रयत्न केले. पण तो गोल्ड मेडल जिंकण्यात कमी पडला. 8 ऑगस्टला म्हणजे काल जॅवलिन थ्रो ची फायनल झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन गोल्ड मेडल मिळवलं. अर्शद नदीमने नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला. त्यामुळे नीरजसह सर्व भारतीयांच गोल्ड मेडल जिंकण्याच स्वप्न भंग पावलं.

टोक्यो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल विजेत्या नीरजने जोरदार प्रयत्न केले. पण त्याला 89.45 मीटर अंतरापर्यंत थ्रो करता आला. त्यामुळे नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानाव लागलं. नीरज चोप्रा अर्शद नदीमपेक्षा मागे का पडला? त्याचं कारण आता समोर आलं आहे. नीरज चोप्राने फायनलनंतर खुलासा केला की, ग्रोइन इंजरी असताना तो फायनलमध्ये सहभागी झालेला.

दुखापतीवर मात करण्यासाठी नीरजला आता सर्जरी करण्याची गरज पडू शकते. देशाचा गौरव लक्षात घेता नीरज चोप्राने आपली इंजरी लपवून ठेवली. इंजरी असतानाही त्याने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला तोडीस तोड टक्कर दिली. पण अखेर सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. सामन्यानंतर मीडियाशी बोलताना नीरज चोप्राने त्याच्या दुखापतीचा खुलासा केला. लवकरच डॉक्टरकडे जाणार असल्याच त्याने सांगितलं. सर्जरीची गरज लागू शकते. सर्जरीपर्यंत विषय पोहोचलाय तर त्याला मैदानापासून लांब रहावं लागू शकतं. पुढच्या काही काळासाठी त्याला काही स्पर्धांपासून दूर रहावं लागू शकतं.

पॅरिस ऑलिम्पिकआधी सुद्धा इंजरी वाढण्याच्या भितीमुळे त्याने काही टुर्नामेंटसमध्ये भाग घेतला नव्हता. नीरजने हे सुद्धा सांगितलं की, त्याच्याकडून काही चुका होतायत. पण इंजरीमुळे त्या चूका सुधारता येत नाहीयत. नीरज चोप्राच्या आईने सुद्धा सांगितलं की, तो दुखापतीसह खेळत होता. माझ्यासाठी रौप्य सुद्धा सुवर्ण पदकासारखच आहे असं नीरजची आई म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here