धक्कादायक! सापाने दंश केल्याचा बदला घेण्यासाठी तरुणाने चक्क घेतला सापाचा चावा

0
137

बिहार येथे एक विचित्र घटना घडली आहे. सापने दंश केल्याचा बदला घेण्यासाठी तरुणाने चक्क सापाचा चावा घेतला आहे. ही घटना बिहार येथील राजौली ब्लॉक जंगल परिसरात घडली आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर तरुणाला सापाने चावा घेतल्या, याचा बदला घेण्यासाठी तरुणाने सापाला पकडले आणि तीन वेळा त्याचा चावा घेतला. या घटनेनंतर सापाचा मृत्यू झाला आहे. तर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाने साप का चावला या बाबत सगळेच संभ्रमात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजौली येथे वनक्षेत्र परिसरात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरु होते. कामगार सर्व काम आपटून बैस कॅम्पमध्ये झोपले होते. झोपेत असताना संतोष लाहोर यांना साप चावला. साप चावल्याने त्यांनी पटकन सापाला हातात पकडले. त्याचा तीन वेळा चावा घेतला. धक्कादायक म्हणजे चावा घेतल्यानंतर सापाचा लगेच मृत्यू झाला.

संतोष हे झारखंड लातेहार जिल्ह्यातील पांडूका येथील रहिवासी आहे. संतोषने या बाबत सांगितले की, त्यांचा गावात अंधश्रध्दा आहे. साप चावल्याने त्याचा तीन वेळा चावून बदला घेवा. ज्यामुळे सापाचा विषारी प्रभाव नाहीसा होता. या अंधश्रध्देवर विश्वास ठेवून त्याने हे कृत्य केले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी संतोषला रुग्णालयात दाखल करण्यात आले. साप विषारी नसावा म्हणून संतोषचा जीव वाचला अशी चर्चा बिहार शहरात रंगली आहे.

पहा पोस्ट: